March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
              कासारी येथे पारंपारिक पद्धतीने बैलांची मिरवणूक काढून बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला,       

कासारी (ता.शिरुर) येथील  माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी सुखदेव भुजबळ हे बैलप्रेमी म्हणून परिसरात परिचित आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सालाबादप्रमाणे बैलपोळ्या निमित्त बैलांची मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी बैलांना सजवण्यात आले. कासारीच्या सरपंच सुनीता भुजबळ व पोलीस पाटील रुपाली भुजबळ यांनी बैलांचे पूजन केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बैलपोळ्या निमित्त आमदार अशोक पवार यांनी भ्रमणध्वनीवर शुभेच्छा दिल्या,