शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महिलांनी सोमवारी (दि.२६) नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने भर पावसात श्री क्षेत्र कुंड येथून मळगंगा देवीची ज्योत आणून देवीची प्रतिष्ठापना केली आहे.
गिनीज बुकमध्ये नोंद असलेले टाकळी हाजी येथील कुंड पर्यटन क्षेत्र येथील मळगंगा देवी ची ज्योत नेण्यासाठी शिरूर तालुक्यातील अनेक गावांमधून भाविक येत असतात. म्हसेफाटा येथील महिलांनी भर पावसात कुंड येथून देवीची ज्योत देवीच्या गाण्यांच्या आणि जयघोषात मोठ्या आनंदाने आणून नवरात्री उत्सवास सुरुवात केली आहे.
शेती हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या महिलांना इतर सांस्कृतिक कार्यक्रमात जास्त सहभाग घेता येत नाही. सकाळपासूनच पाऊस पडत असल्यामुळे शेतीची कामे करता येत नव्हते, त्यामुळे मोठ्या संख्येने महिला एकत्र येवुन त्यांनी तिर्थक्षेत्र कुंड येथून मळगंगा देवीची ज्योत आणण्याचा आनंद लुटला.
यावेळी टाकळी हाजी च्या सरपंच अरूणा घोडे,ग्रामपंचायत सदस्या मनीषा घोडे, मंगल लोखंडे, नंदा लोखंडे, सुनिता करकंडे,जयश्री करकंडे, निर्मला पवळे, जिजाबाई पवळे,मीना पवळे, चंद्रकला भोसले, ललिता भोसले, आदिका पवळे, सरिता करकंडे, भिमाबाई नरवडे , सुजाता नरवडे, मंदाबाई टेमकर, साकराबाई चाटे, सुशिला भोसले, मिनाक्षी नरवडे, मनिषा वरखडे आदी महिलांनी सहभाग घेतला. तर विक्रम घोडे, अक्षय वरखडे,प्रशांत भोसले,अनिकेत रसाळ, संतोष टेमकर,गणेश घोडे यांनी त्यांना सहकार्य केले.

