शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
करंदी (तालुका शिरूर) येथे अज्ञात चोरट्यांनी रोहित्र फोडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे रोहित्रमधील तांबे चोरून नेल्याची घटना रविवार (दि. २१ ऑगस्ट) रोजी घडली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात शिक्रापूर महावितरण कार्यालयातील सोमनाथ शिवपुत्र कनोज (वय ३० वर्षे, रा. जातेगाव बुद्रुक, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी फिरत दिल्याने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार करंदी (वरपे वस्ती, पोटचारी, ता.शिरुर, जि. पुणे) येथील १०० केव्हीएचा डिपी अज्ञात चोरट्यानी फोडून त्यामधील अंदाजे ४० किलो वजनाच्या व सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोऴी पुढील तपास करत आहेत.


