शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता भाभी पवार यांचे चिरंजीव ऋषीराज पवार यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने सणसवाडी या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सणसवाडी येथील श्रद्धास्थान श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार म्हणून श्री नरेश्वर या ठिकाणी ऋषिराज यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, याप्रसंगी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, अन्नदान करण्यात आले, तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला,
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित आप्पा दरेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ हरगुडे, चेअरमन सुहास दरेकर, समता परिषद जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, माजी चेअरमन गोरख दरेकर, नवनाथ दरेकर माजी सदस्य रामभाऊ दरेकर, सुभाष दरेकर, माजी सदस्य अनिल दरेकर, प्रशांत दरेकर, सुखदेव दरेकर, बबन दरेकर, बापू दरेकर, शाम दरेकर, निलेश दरेकर, अनिल गोटे, प्रकाश जाधव व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


