तसेच सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान चिन्ह व मिठाई देऊन निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत च्या माध्यमातून बापूसाहेब काळे सरपंच निमगाव म्हाळुंगी, संस्थापक अध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, भाजपा उत्तर पुणे जिल्हा संयोजक मन की बात यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच निमगाव म्हाळुंगी चे ग्रामपंचायत सदस्य डॉ. सचिन चव्हाण, जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक मारुती निकम आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ लांडगे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जेष्ठ पत्रकार प्रवीणकुमार जगताप, भरारीचे संपादक सुनील भंडारे पाटील, शेरखान शेख, शरदराव रासकर, जालिंदर आदक, घनशाम तोडकर, उदय ब्राम्हणे,निलेश जगताप,यांनी मनोगत व्यक्त केली.
गेल्या 23 वर्षापासून केलेल्या सामाजिक कार्यामुळे माझ्यावर गावानं विश्वास दाखवला आणि मला बिनविरोध निवडून दिले आहे त्यामुळे गावानं जो विश्वास दाखवला तो मला सार्थकी करून दाखवायचा आहे अशा शब्दात गावाकऱ्यांचे कौतुक केले.आणि आणि आपण सर्व पत्रकारांनी मला जी गेल्या 23 वर्षा पासून निस्वार्थपणे साथ दिली,
आपण माझे कार्य आपल्या सर्वांच्या माध्यमातूम तळागाळातील समाजापर्यंत पोहचवले त्या बद्दल आपले मी कधीही ऋण फेडू शकणार नाही परंतु मला आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मी पाहत होतो आणि ती संधी आज मला मिळाली अशा प्रकारचे पत्रकारांचे कौतुक करून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून बापूसाहेब काळे यांनी आभार मानले.
गावातील सर्वसाधारण कुटुंबातील युवक पत्रकार आणि प्रसिद्ध कवी आकाश भोरडे यांनी आपल्या पत्रकारिता आणि कवितांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवला निमगावचे नाव लौकिक केले तसेच त्यांना आता महाराष्ट्ररत्न पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल गावच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानून कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांना पत्रकार बांधव आणि गावच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सदर सन्मानाच्या वेळी गावातील आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये सुजाता चव्हाण, कामिनी नागवडे, अपेक्षा टाकळकर, वसंत भागवत, प्रदीप करपे, विठाबाई पवार या सर्वांचा त्यामध्ये सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील जेष्ठ नागरिक नामदेव काळे, बाबुराव चौधरी,सागर कुसाळकर,कुणाल काळे, प्रज्वल काळे, उपस्थित होते. तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.सदर कार्यक्रम प्रसंगी पत्रकार निलेश जगताप यांनी सूत्रसंचालन केले आणि जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मारुती निकम सर यांनी सर्वांचे आभार मानले.
