March 30, 2026

संपादक सुनील भंडारे पाटील

       दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. “अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे” प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात.  हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार) आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते. हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो.         

        विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्त्वांशी दिवाळी जोडलेली आहे, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून श्री राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे.         

          इतर प्रादेशिक परंपरा या सणाला  विष्णूकृष्णदुर्गा, शिकालीहनुमानकुबेरयम, यमी, धन्वंतरी, किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात. जैन लोक दिवाळी साजरी करतात जी महावीरांच्या अंतिम मुक्तिचे प्रतीक आहे. मुघल तुरुंगातून गुरू हरगोविंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिछोर दिवस साजरा करतात, तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात.  

        या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदीलांनी प्रकाशित करतात. हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात . फटाके  आणि   रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे.   

       केवळ कुटुंबांसाठीच नव्हे तर समुदाय आणि विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. शहरांतील उद्यानांमध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळ्यांचे आयोजन केले जाते. काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात, सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजांचे स्मरण.

        हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी दिवाळी हा एक प्रमुख सन म्हणून साजरा करत  आहे. दिवाळीच्या सणाचा मुख्य दिवस (लक्ष्मीपूजनाचा दिवस) हा फिजी,  गयाना,  भारतमलेशियामॉरिशसम्यानमारनेपाळ,  पाकिस्तानसिंगापूरश्रीलंका, सुरीनामत्रिनिदाद आणि टोबॅगो येथे अधिकृत सुट्टीचा दिवस असतो.