March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
                  मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्ष युद्धाला अखेर खूप मोठे यश मिळाले असून अखेर राज्य सरकारला भगव्या वादळाच्या महा प्रलयाच्या समोर झुकावे लागले, जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आले असून आज पहाटे तीन वाजता राज्य सरकारची शिष्ट मंडळ यांनी तसे पत्र दिली आहे, आज सकाळी साडेआठ वाजता तसा अध्यादेश देऊन जरांगे पाटील उपोषण थांबवणार आहेत,

                    20 जानेवारी रोजी राज्य सरकारला दिलेल्या दोन महिन्यांच्या मुदतीनंतर अंतरावली, सराटी  जिल्हा जालना येथून निघालेल्या जरांगे पाटील यांच्या भगव्या वादळाने पुढे अनेक शहरांपासून प्रस्थान करत अखेर 26 जानेवारी ला मुंबई घाटली होती, भगव्या वादळाचा महापूर पाहता राज्य सरकारला घाम फुटला दरम्यान जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यामध्ये 40 च्या वर समझोता बैठका झाल्या परंतु जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असल्याकारणाने अखेर त्यांचा विजय झाला असून आझाद मैदान येथे 26 जानेवारी ला सुरू झालेल्या उपोषणानंतर आज 27 जानेवारी रोजी पहाटे 3:00 वाजता जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आले आहेत, राज्य सरकार तसा अध्यादेश आज सकाळी देणार असून त्यानंतर जरांगे पाटील उपोषण मागे घेणार आहे,

                   मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले असून अंतरावली सराटी येथे जाऊन आनंद उत्सव तसेच गुलालाची उधाळण करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले,