श्रीगोंदा तालुक्यातील थेऊरकर वाडी या एका छोट्याशा गावातील एका जिद्दी तरुणाने गरीब परिस्थितीवर मात करून सीए होण्याचा किताब नुकताच मिळविला आहे. त्याने आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेऊरकर वाडी येथे पूर्ण केले.तसेच माध्यमिक शिक्षण – न्यू इंग्लिश स्कूल शिरूर मध्ये व उच्च शिक्षणासाठी १२ वी नंतर पुणे, हे सर्व शिक्षण घेत असताना २०११ मध्ये इंद्रभान थेऊरकर या वडिलांचे छत्र हरपले.
पुढे जाऊन मुलाची जबाबदारी आई वरती आली. मुलांचे शिक्षण, संगोपन घरची परिस्थिती गरीब असताना. रोज मोलमजुरी करून. त्या नंतर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत-करत मुलांचे शिक्षण केले. पुढे जाऊन २०२२ मध्ये आईचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वप्निल चे मोठे बंधू सुरज वरती आली. तो औषध कंपनीत एक्सपोर्ट इम्पोर्ट विभागात कामाला असून , स्वप्निल CA झाला पाहिजे हे आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे. ही जिद्द उराशी बाळगून. पुढे लागणारी मदत येणारा खर्च, सर्व पुरवण्याची जिम्मेदारी सुरज वर आली परंतु त्याला साथ धीर देणारे त्याचे चुलत मोठे बंधू राम थेऊरकर हे मुरलीकृष्णा कंपनी मध्ये ( HR ) म्हणून काम पाहतात. तसेच निलेश येलभर. दिलिप थेऊरकर (सरपंच ), चुलते उत्तम थेऊरकर या सर्वांची आर्थिक मदतीचा हात दिला व सीए होण्यासाठी मार्गदर्शन म्हणुन राहुल देवराम थेऊरकर यांचे लाभले
अश्या या सर्व गरिब परिस्थितीवर मात करून स्वप्नील चे कष्ट, चिकाटी, आणि जिद्द या सर्व गोष्टी उराशी बाळगून सनदी लेखापाल बनून आईचे व भावाचे स्वप्न पूर्ण स्वप्निल ने केले.
.चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मिळवलेले उज्वल यश पाहण्यासाठी आज आई-वडील हवे होते हे सांगताना दोन्ही भावांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते,या मोटेवाडी व थेऊरकरवाडी ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ही परीक्षा अत्यंत अवघड समिती जाते परंतु त्या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे स्वप्निल थेऊरकर सनदी लेखापाल झाल्यामुळे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.