विशेष म्हणजे आज पर्यंत शिरुर तालुक्यातील शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका ही गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला तालुक्यात परवानगी दिलेली नव्हते, मिळालेल्या माहितीनुसार या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला देखील शिक्रापूर पोलीस पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती, असे असताना देखील आयोजकांच्या वतीने गौतमी पाटील ला बोलवून तिच्या काही गाण्यांचा कार्यक्रम देखील पार पाडला,
विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या वेळी शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील एक अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित असल्याने ” ती आली पोलिसांसमोर थिरकून ही गेली” अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.त्यामुळे परवानगी नसतानाही कार्यक्रम घेतल्याने कार्यक्रमाच्या आयोजकांवरती शिक्रापूर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे,
