March 30, 2026
रांजणगाव गणपती प्रतिनिधी 
               मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य ते सहकार्य केले जाईल अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली. रांजणगाव गणपती-कारेगाव (तालुका शिरूर) च्या शिवेवर ज्या मैदानात मनोज जरांगे यांची सभा होणार त्या मैदानाची पाहणी करुन सभेचे आयोजन करण्या-या शिरुर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

      या प्रसंगी शेखरदादा पाचुंदकर पाटील, बापुसाहेब शिंदे

रामभाऊ सासवडे, ,राहुल गवारे,संदिप नवले,सोपान नरवडे, नानासाहेब लांडे, अँड सुधीर ढमढेरे ,  वढु बुद्रुक चे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले , संभाजी कर्डीले , 
कुमार नाणेकर,उमेश‌ शेळके,विजय साळुंखे, रामभाऊ म्हस्के, शामराव खरबस , आप्पा टाव्हरे,सचिन कुटे,शामकांत वर्पे , रामदास दरेकर, परशुराम डांगे आदींसह शिरुर तालुक्यातील अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. 

          या ठिकाणी होणारी सभा व सभेसह मुंबईला आंदोलनाला जाणाऱ्या नागरिकांची आकडेवारी पाहता. २२ व २३ तारखेला पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत आवश्यक तो बदल करण्यात येईल. तसेच शेखर पाचुंदकर , बापुसाहेब शिंदे व अँड. सुधीर ढमढेरे  यांनी जिल्हाधिकारी पुणे यांनी या सभेच्या व मोर्च्याच्या अनुशंगाने सभेच्या  व मोर्च्याच्या ठिकाणी फिरती शौचालये उपलब्ध करुन द्यावीत. तसेच २२ जानेवारी रोजी शासनाने जाहिर केलेल्या सुट्टीच्या अनुशंगाने व या सभेला होणाऱ्या गर्दीच्या व २३ तारखेच्या चंदननगर पर्यतच्या प्रवासाच्या अनुशंगाने पुणे-नगर  महामार्गालगत च्या सर्व औद्योगिक वसाहती बंद ठेवण्याची सुचना केली असता या बाबत कंपन्यांशी चर्चा करुन  निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. तसेच या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी , शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण , संजय जगताप , पोलीस उपनिरीक्षक  निळकंठ तिडके , अनिल मोरडे , शिवाजी मुंढे आदी उपस्थित होते,