March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

          सबसे कातील गौतमी पाटील’ आजपर्यंत आपण वाढदिवसाच्या कार्यक्रमात तर कधी दिवाळी पहाट कार्यक्रमात, बैला समोर नाचताना पाहिले आहे,आता तर चक्क गौतम पाटील पुण्याच्या सणसवाडी येथील क्रिकेट मैदानात थिरकताना  दिसली आहे.
शिरूर तालुक्यातील भाजप क्रीडा आघाडीच्या एका पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिरूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्याला थिरकताना पाहायला मिळाली आहे.

        विशेष म्हणजे आज पर्यंत शिरुर तालुक्यातील शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी एका ही गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला तालुक्यात परवानगी दिलेली  नव्हते, मिळालेल्या माहितीनुसार या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला देखील शिक्रापूर पोलीस पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती, असे असताना देखील आयोजकांच्या वतीने गौतमी पाटील ला  बोलवून  तिच्या काही  गाण्यांचा कार्यक्रम देखील पार पाडला,

       विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या वेळी शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील  एक अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित असल्याने ” ती आली पोलिसांसमोर थिरकून ही  गेली” अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.त्यामुळे परवानगी  नसतानाही कार्यक्रम घेतल्याने कार्यक्रमाच्या आयोजकांवरती शिक्रापूर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे,

       शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले की, सणसवाडी येथे झालेल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये गौतमी पाटील यांना  फक्त बक्षीस वितरण करण्याची परवानगी होती, नाचण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती,