March 30, 2026

सुनील भंडारे पाटील 

        बकोरी (तालुका हवेली) देवराई वनराई प्रकल्पात माहीती सेवा समिती व दादा  बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांचे माध्यमातुन २०१७ पासुन वृक्षरोपण करण्यात येत आहे आज अखेर ५०००० झाडे लावून पुर्ण झाली आहेत त्याचे संगोपन नियमित चालू आहे .भविष्यात १ कोटी झाडे लावण्याचे स्वप्न असल्याचे वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले. 

         आज आयोध्येला प्रभु श्री रामचंद्र यांचे प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे हा सोहळा आपल्या देशासाठी खुप महत्वाचा आहे त्याचा ईतिहास लिहिला जाणार आहे आपनही प्रभु रामचंद्राची आठवण शेकडो वर्षे राहीली पाहिजे यासाठी बकोरी देवराई वनराई प्रकल्पात वृक्षरोपण करण्याचे ठरवले व त्याठीकानी १०८ पिंपळ वृक्षाचे झाडांचे वृक्षारोपण केले वनराई रामलल्लाचे पुजन केले व मोठ्या आनंदाने वृक्षरोपण केले.वृक्षरोपण कार्यक्रमासाठी वृक्षमित्र गणेश जाधव सर ,वृक्षमित्र संदीप डफळ सर ,चंद्रकांत वारघडे, धनराज वारघडे गणेश पन्हाळकर,ऊमेश गजमुख हे उपस्थित होते. 

वृक्षमित्र योगेश सातव यांनी पिंपळाची १०८ झाडे दान दिली.