March 30, 2026
वाघोली-केसनंद रोडवर नागरिकांचे आंदोलन    वाहतूक कोंडी व रस्त्याच्या दुरावस्थेबाबत संताप

वाघोली-केसनंद रोडवर नागरिकांचे आंदोलन  

वाहतूक कोंडी व रस्त्याच्या दुरावस्थेबाबत संताप

वाघोली प्रतिनिधी 

वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशन व केसनंद रोडलगतच्या सोसायट्यांतील नागरिकांनी शनिवारी एकत्र येत भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली वाघोली-केसनंद रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व रस्त्याच्या दुरावस्थेबाबत रास्ता रोको आंदोलन केले.

भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी केली. परंतु संबधित विभाग मागणीची दखल घेत नसल्याने अखेर शनिवारी (३० ऑगस्ट) भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली असंख्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून संताप व्यक्त केला.

प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेवून लवकरच रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संदिप सातव, प्रकाश जमधडे यांच्यासह विविध सोसायट्यांतील असंख्य नागरिक सक्रिय सहभागी झाले होते.

वाघोली-केसनंद रोडवरील कोणार्क ऑर्चीड गेटच्या समोर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. अपघातामुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच नागरिकांना नित्याच्याच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. संबधित अधिकाऱ्यांनी आश्वासन पाळले नाही तर मोठे जनआंदोलन उभारले जाईल. – संदिप आबा सातव (जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पुणे)