March 30, 2026
बोगस मतदानाने केला अशोक पवारांचा घात-आ रोहित दादा पवार

बोगस मतदानाने केला अशोक पवारांचा घात-आमदार रोहित दादा पवार

केसनंद मध्ये एकाच घरात १८८ सर्व जातीधर्मीय मतदारांचे बोगस घर 

सुनील भंडारे पाटील 

शिरूर विधानसभा मतदारसंघातील केसनंद या गावांमध्ये 188 सर्व जातीधर्मीय मतदार अदृश्य घरात राहत असल्याचे पुरावे मतदार यादी दाखवत आमदार रोहित पवार यांनी केसनंद ग्रामपंचायत समोर येऊन दिले.

निवडणूक आयोगाच्या या गलथान कारभारामुळे माजी आमदार अशोक पवार यांचा पराभव झाला असून त्याचा निषेध करण्यासाठी बोगस मतपत्रिका जाळून केसनंद ग्रामपंचायत समोर अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली,

शिरूर हवेली मतदारसंघांमध्ये आणि गावात बोगस मतदान निदर्शनास आले असून याकडे निवडणूक आयोगाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, हे बोगस मतदान समाजासमोर आणण्यासाठी माजी आमदार अशोक बापू पवार यांचा जोरदार लढा चालू आहे,

शिरूर हवेली मतदारसंघातील महत्त्वाचे असणाऱ्या हवेली तालुक्यातील केसनंद या गावामध्ये चक्क एकाच घरात सुमारे 188 बोगस मतदान सापडले असून यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचा उल्लेख केला असल्याचे उघड झाले आहे,

या प्रकाराचा पडदा फास करत आमदार रोहित दादा पवार यांनी केसनंद ग्रामपंचायत समोर या बोगस मतदानाची मतदार यादी जाळून निषेध केला, याप्रसंगी शिरूर हवेली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,

याप्रसंगी माजी आमदार अशोक पवार यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बोगस मतपत्रिकेची ऐन दिवाळीत होळी करून बोगस मतदानाने केला अशोक पवारांचा घात असे प्रतिपादन आमदार रोहित दादा पवार यांनी केले,