एक गुंठा जागेवर हक्काचे घर होईल तेव्हाच खरी दिवाळी आमदार बापूसाहेब पठारे

सुनील भंडारे पाटील
वाघोली तालुका हवेली) येथील वाघेश्वर नगर येथे सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाच्या सहाव्या दिवशी आंदोलनाला पाठिंबा देताना दगडखान कामगारांना हक्काचे घर आणि त्यांच्या नावे जेव्हा एक गुंठा जमीन मिळेल तेव्हाच खरी दिवाळी साजरी होईल असे प्रतिपादन वडगाव शेरी मतदार संघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांनी मांडले
एडवोकेट बी एम रेगे यांनी दगडखान कामगारांच्या विविध प्रश्नावर बापूसाहेब पठारे यांनी कायम मोलाचे सहकार्य केल्याचे मत मांडले.

वाघोली गावाचे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय आप्पा सातव पाटील यांनी वाघोली गायरान अतिक्रमण धारकांच्या विकासात अडसर ठरणारे खारीतील शुक्राचार्य ओळखण्याची खरी गरज असल्याचे मत शिवसेना नेते संजय सातव यांनी मांडले

सत्याग्रहामध्ये अन्नत्याग उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून उपोषण करते संतुलन संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष एडवोकेट बी एन रेगे तसेच त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची प्रकृती खालवत चालली असून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या उपोषणकर्तच्या मागणीवर तोडगा काढून निर्णय द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे,

