बुर्केगाव येथील रस्त्याचा वनवास संपला पै किरण साकोरे यांनी केले स्वखर्चातून मुरमीकरण
सुनील भंडारे पाटील
लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील बुर्केगाव (तालुका हवेली) येथील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन बुर्केगाव ते वाडेबोल्हाई या दीड किलोमीटरच्या रस्त्याचे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कोर कमिटीचे सदस्य प्रदीप दादा कंद यांच्या मार्गदर्शना नुसार स्वखर्चातून मुरमीकरण करून पैलवान किरण साकोरे यांनी समाजासमोर एक आदर्श तयार केला आहे,
संबंधित रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र असून शेतीशी निगडित लहान मोठे व्यवसाय देखील आहेत शिवाय वाडेवस्त्यावरील शाळकरी मुले, शेतमाल वाहतूक ,ऊस वाहतूक ,यामध्ये खूप अडचणी येत होत्या ,
ही अनेक दिवसांची अडचण पैलवान साकोरे यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांनी तातडीने नियोजन करून संबंधित दीड किलोमीटरच्या रस्त्याचे स्वखर्चाने मुरूमीकरण केले त्यामुळे अनेक वर्षांची असलेली अडचण दूर झाली,
पैलवान किरण साकोरे यांच्या या योगदानाबद्दल बुर्केगाव ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांनी कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, बुर्केगाव येथील रस्त्याचा अनेक वर्षांचा वनवास संपला असे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले,
