लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात योगेशभाऊ झुरुंगे मित्र परिवार आयोजित खेळ पैठणीचा
सुनील भंडारे पाटील
लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील पेरणे, वढू आणि फुलगाव परिसरातील सर्व माता-भगिनींसाठी लोणीकंद गावचे माजी उपसरपंच योगेशभाऊ झुरुंगे मित्रपरिवार यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘खेळ पैठणीचा, सन्मान नारीशक्तीचा’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट निवेदिका पुरस्कार विजेत्या प्रतिभा पाटील यांच्या विशेष उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रम सादर होणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी पेरणे फाटा येथील सॅफरॉन बँक्वेट हॉल, आमदार नगर येथे आयोजित होणार आहे.
महिलांच्या सहभागातून येथील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, परिसरातील सर्व माता-भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक योगेश भाऊ झुरुंगे मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
