March 30, 2026
यूनिट ६ ची धडाकेबाज कामगिरी…! वाघोलीत नऊ किलो गांजा जप्त

वाघोलीत गांजा विक्रीसाठी आलेला एकजण ताब्यात; नऊ किलो गांजा जप्त ; गुन्हे शाखा यूनिट ६ ची धडाकेबाज कारवाई

सुनील भंडारे पाटील

दिनांक 26/08/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट -६ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना ऋषीकेश व्यवहारे यांना केसनंद फाटा चौकाजवळ,

वाहन पार्किंगचे मोकळ्या जागेतून, वाघोली पुणे येथे एक इसम आपले कब्जात पांढरे रंगाची पिशवी बाळगून काहीतरी लपवत असलेबाबत दिसला त्याचेकडे जात असताना तो पळून जाऊ लागल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन

त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात गांजा स्वरूपाचा अंमली पदार्थ मिळून आला . त्याचे ताब्यातून एकूण 1,83,600/- रुपये किमतीचा 9 किलो 350 ग्रॅम वजनाचा गाजा हा अंमली पदार्थ गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव कुणाल दीपक गुरव, वय 29 वर्ष, रा. हिंदू व्यायाम शाळेजवळ, शहादा, जि . नंदुरबार असे सांगितले.

त्याचे विरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन येथे NDPS कलम 8(क),20(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पुढील तपास कामी वाघोली पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन करण्यात आले आहे.

 

सदरची कामगिरी  पंकज देशमुख अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे पोलीस उपआयुक्त गुन्हे, सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे-2 राजेंद्र मुळीक या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली

प्रभारी पोलीस निरीक्षक युनिट-६ वाहीद पठाण, अति. कार्यभार पोलीस निरीक्षक युनिट-५ संजय पतंगे, सहा पोलीस निरीक्षक मदन कांबळे, सारंग दळे, निलेश साळवे, निर्णय लांडे, गिरीश नाणेकर, प्रशांत कापुरे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे, नेहा तापकीर, प्रतीक्षा पानसरे यांचे पथकाने केलेली आहे.