March 30, 2026
युनिट 6 ची दमदार कामगिरी दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नाशिक येथून जेरबंद

 

 

युनिट 6 ची दमदार कामगिरी दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नाशिक येथून जेरबंद

सुनील भंडारे पाटील

दिनांक २२/१०/२०२४ रोजी डेक्कन पोलीस स्टेशन हदीत प्रभात मार्शल नाईट पेट्रोलिंग करत असताना सहा अनोळखी इसम त्यांचेकडील धारदार हत्यारांसह दरोडया सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचे उद्देशात असताना

त्यांना रोखण्याचा प्रयल्न केला असता आरोपींनी सदर प्रभात मार्शलचे पोलीस अंमलदाराचे हाताचे पोटरीवर धारदार शस्त्राने वार केला होता. त्यावेळी पोलीस अंमलदार यांनी स्वसंरक्षणासाठी त्यांचेकडील शासकीय पिस्टल मधुन दोन राउंड आरोपींचे दिशेने फायर केले. त्यावेळठी दोन आरोपी जखमी झाले होते.

अंधाराचा फायदा घेवुन आरोपी पळून गेले होते. सदर बाबत डेक्कन पो.स्टे. गु.र. नं. १७१२०२४, भा. न्या. सं. कलम ३१० (१). 9२(७). १३२ सह भारतीय हत्यार कायदा ४(२५) सह म.. पो कायदा ३७(१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयातील एका आरोपीस यापूर्वी गुहे शाखा व डेक्कन पोलीस स्टेशनकडुन अटक करण्यात आली होती व इतर पाच आरोपींना मा. न्यायालयाने फरारी घोषीत केले होते.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेबुन गु्हे शाखेकडुन गुन्हयाचा समांतर तपास सुरू असताना दिनांक ०१/०७/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना या गुन्हयातील पोलीस अंमलदारांवर वार करणारा मख्य फरार आरोपी नामे फिरोजखां शरीफखां दुल्होत उफ मेवाती, वय ३४ . रा. झंजाल, पोर्ट अंबई सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर हा नाशिक येथे येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. सदर बातमीच्या अनुषंगाने परवानगीने तात्काळ स.पो.नि. राकेश कदम, पो.हवा सुहास तांबेकर, पोलीस अंमलदार ‘ऋषीकेश ताकवणे व सचिन पवार’ यांना नाशिक’ येथे रवाना करण्यात आले होते.

सदर पथकाने स्थानिक भद्रकाली पोलीस स्टेशनच्या मदतीने नमूद आरोपीतास बी. डी. भालेकर मैदान, कान्हेरेवाडी, भद्रकाली, नाशिक येथून सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

नमूद आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचेविरुद्ध अनेक गन्हे दाखल आहेत. नमूद आरोपीस मा. विष्तंच्या परवानगीने पुढील कारवाई कामी डेक्कन पो. स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे,

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयूक्त (गुन्हे) पंकज देशमख. मा.पोलीस उपआयक्त (गुन्हे) निखिल पिंगळे मा सहा.पोलींस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक गन्हे शाखा, पोंनि वाहीद पठाण यनिट -६ यांचे मार्गर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ कडील

सपौनि राकेश कदम , सपोनि मदन कांबळे, पो.हवा. बाळासाहेब सकटे. नितीन मुंढे, सारंग दळे, कानिफनाथ कारखेले, प्रशंत कापुरे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, म.पोहवा नेहा तापकीर, पो.अं. ऋरषीकेश ताकवणे पो.अं.सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, मपोअं पानसरे, मांदळे, नरवडे यांनी केली आहे,