शिरूर हवेलीच्या जनतेला मा आ अशोक बापू पवार यांची आठवण
सुनील भंडारे पाटील
शिरूर हवेली विधानसभेमध्ये आता जनतेला माजी आमदार अशोक बापू पवार यांची पावलोपावली आठवण येऊ लागली आहे, हवेली तसेच शिरूरच्या अनेक गावांमध्ये अशोक बापू पवार आमदार व्हायला हवे होते अशी चर्चा रंगू लागली आहे,
माजी आमदार अशोक बापू पवार यांची विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये विकास कामांची रेलचेल दिसत होती, सत्ता नसताना विरोधी पक्षात बसून बापूंनी विकास कामांचा ध्यास जणू धरला होता, मतदार संघात एकही गाव असे नाही की जिथे मा आमदार अशोक बापू पवार यांचा विकास कामाचा बोर्ड नाही,
जबाबदारीने विकास कामे त्याचबरोबर पुणे सारख्या मोठ्या शहरातील जहांगीर हॉस्पिटल, रुबी हॉल, के ई एम, ससून, कोलंबिया, रक्षक, भारती हॉस्पिटल सारख्या अनेक हॉस्पिटलमध्ये गरीब लोकांना मोफत उपचार मिळवून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता, आजही पदावर नसताना बापू लोकांना हॉस्पिटलची मदत करत आहेत,
शेतकरी वर्गात शेती पंपाला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र जळाले तर बापूंना फक्त एकच फोन केला तर त्या दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी रोहित्र टाकून दिले जायचे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला ऐन उन्हाळ्याच्या दिवसात जीवदान मिळायचे व शेतकऱ्यांचा फायदा व्हायचा,
कोरोना सारख्या महामारीत बापूंनी मतदारसंघात सुमारे तेरा कोविड सेंटर खोलून गोरगरिबांना जीवदान दिले, सिरीयस पेशंट ना पुणे शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार व बेड मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी बजावले,
अशा अनेक कामांच्यामुळे अशोक बापू आता लोकांच्या आठवणीत येऊ लागले आहेत, आजही जनतेला एखादा प्रश्न उपस्थित झाला तर बापूंचीच पावलोपावली आठवण येते, परंतु वेळ हातातून गेल्यामुळे लोकांना आता फक्त पश्चाताप करण्याची वेळ आली आहे, असे वातावरण नागरिकांमध्ये दिसत आहे,
