थोरांदळे पुणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी उद्यमिता विकास कार्यक्रमाचा शुभारंभ
आंबेगाव प्रतिनिधी प्रमिला टेमगिरे
भारतीय उद्यमिता विकास संस्थान (EDII) आणि अॅक्सेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने थोरांदळे (तालुका आंबेगाव) पुणे येथे महिलांसाठी “केमिकल फ्री हॅन्ड वॉश, बॉडी वॉश, साबण ,शॅम्पो” या विषयावर 20 दिवसीय सूक्ष्म कौशल्य उद्यमिता विकास कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
हा उपक्रम महिलांना उद्योग कौशल्ये, साधने आणि आत्मविश्वास देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा उद्देश ठेवतो, ज्यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता येईल आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीत हातभार लागेल.
उद्घाटन समारंभात जे डी टेमगिरे सरपंच थोरांदळे, शिवशंकर डेअरीचे चेअरमन बाळासाहेब टेमगिरे,आरोग्य विभाग निरगुडसर धर्मराज कोळी , ज्योतीताई वाळुंज,
ग्रामपंचायत अधिकारी थोरांदळे अनिता राशीनकर,ग्रामसंघ उमेदवार पदाधिकारी व CRP अश्विनीताई टेमगिरे,ग्राम संघ अध्यक्ष संगीता टेमगिरे,आरती ताई, प्रमिला ताई,मनीषा ताई,सुप्रिया ताई, संजना ताई रेश्मा ताई इतर महिला पदाधिकारी व भारतीय उद्यामिता विकास संस्थेचे विकास गोफणे व रजनी मिरके , व प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.
भारतीय उद्यमिता विकास संस्थान आणि अॅक्सेंचर यांनी पुणे जिल्ह्यातील महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी संपूर्ण पाठबळ, नाविन्यपूर्ण संधी आणि शाश्वत उद्यमशीलतेची परिसंस्था निर्माण करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे.
