सणसवाडी (वसेवाडी) शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल हरगुडे यांची बहुमताने निवड
अमोल काळूराम हरगुडे यांना ८ मते पडल्याने बहुमताने विजयी
ग्रामस्थांसह अनेक मान्यवरांनी केला सत्कार
भरारी न्युज सणसवाडी प्रतिनिधी
सणसवाडी (ता.शिरूर) येथील जिल्हा प्राथमिक शाळा वसेवाडी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली यावेळी अमोल काळूराम हरगुडे यांच्या मागील कार्यकाळात केलेल्या गुणवत्तापूर्ण कामाचा व मनमिळावू स्वभाव तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामाची दखल घेत बहुमताने निवड करण्यात आली.यावेळी उपस्थितांनी योग्य व्यक्तीची योग्य जागी निवड झाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.,
जिल्हा प्राथमिक शाळा वसेवाडी येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली यावेळी ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक न होता बिनविरोध करावी व यावेळी महिला भगिनींना संधी द्यावी असे ठरवण्यात आले पण पत्रकार ,प्रसिद्ध निवेदक व माजी उपाध्यक्ष अमोल दरेकर व अमोल काळूराम हरगुडे यांच्यात एकमत न झाल्याने लढून निवडणूक झाली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याद्यापक संतोष गोसावी यांनी काम पाहिले.या एकी झालेल्या मतदानात अमोल काळूराम हरगुडे यांना बहुमताने निवड करण्यात आली. मात्र यावेळी उपाध्यक्षपदी सोनाली पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल हरगुडे यांच्यावर उपस्थितांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.उपस्थितांनी माजी अध्यक्ष अमोल हरगुडे यांनी यापूर्वी उत्तम व चांगले काम केले असून सर्वांशी मनमिळावू, मितभाषी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे असल्यामुळे त्यांची निवड केल्याचे मत व्यक्त केले.यावेळी दरेकर , सरपंच रुपाली दगडू दरेकर ,उपसरपंच राजेंद्र दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित, माजी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, माजी उपसरपंच विजयराज दरेकर, ग्राम पंचायत सदस्या ललिता दरेकर, निकिता हरगुडे, उद्योजक नवनाथ हरगुडे व शालेय समितीचे सर्व सदस्य, शिक्षकवृंद मान्यवर उपस्थित होते,