पंढरीनाथ नगर मध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये लहान मुलगी गंभीर जखमी
सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील पंढरीनाथ नगर मध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर सध्या दहशत माजवत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
प्रणाली भितडे ही लहान मुलगी बाहेर खेळत असताना कुत्र्याच्या टोळक्यामधील एका कुत्र्याने प्रणालीच्या पायाला चावा घेतला असून तिच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.
भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशा मागण्या येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहेत.
शरीराने मोठा काळा कुत्रा व तीन तांबड्या रंगाचे कुत्रे असे चार कुत्र्यांची एक टोळकी रात्रीच्या सुमारास ठीक ठिकाणी दहशत माजवत असल्याचे बोलले जात आहे.लहान मुले खेळत असतील तर त्यांच्यावर हल्ला करणे,कोणाचे पाळीव प्राणी,पाळीव कुत्रा असेल तर त्याच्यावर ही टोळकी हल्ला करत असून सर्वत्र भीतीचे वातावरण पाहण्यास मिळत आहे.
कोरेगाव भीमा वाडा गावातील पंढरीनाथ नगर मधील त्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे,
![]()
