March 30, 2026
डोंगरगाव मध्ये डोंगर सपाट प्लॉटिंग व्यवसायिकांचा धुमाकूळ महसूल खाते सुस्त 

डोंगरगाव मध्ये डोंगर सपाट प्लॉटिंग व्यवसायिकांचा धुमाकूळ महसूल खाते सुस्त 

सुनील भंडारे पाटील

डोंगरगाव (तालुका हवेली) या निसर्गरम्य गावामध्ये प्लॉटिंग व्यवसायिकांनी निसर्गाची व पर्यावरणाची खूप मोठी हानी करत अक्षरशा गडदे वस्तीवर मोठमोठे डोंगर व टेकड्या सपाट करून प्लॉटिंग व्यवसाय थाटला आहे,

अवैध चाललेले या व्यवसायाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी महसूल खात्याचे पदाधिकारी मात्र दिसून आंधळेपणाचे सोंग आणत आहेत, हवेली तालुक्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये वाडेबोल्हाई व भीमा नदीच्या दरम्यान निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये बसलेल्या या गावांमध्ये गावठाणा कडून सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरापर्यंत बागायत क्षेत्र असून शेतीसाठी पाणी मुबलक आहे,

परंतु पुढे वाडेबोल्हाई देवस्थानच्या बाजूला संपूर्ण डोंगर टेकड्या आहेत , या ठिकाणी उन्हाळ्यात पाणी नसते शिवाय हा भाग पावसाळ्यात हिरव्यागार गालिचांनी निसर्ग सौंदर्याने नटलेला डोंगर भाग असतो,

या भागामध्ये प्लॉटिंग व्यवसायिकांनी अवैधरित्या डोंगर टेकड्यावरील झाडे झुडपे मोठमोठे दगड पाण्याचे स्रोत बंद करून सपाटीकरण करत महसूल खात्याचे सर्व नियम झुगारून अवैधरित्या प्लॉटिंग व्यवसाय खोलले आहेत,

दिवसा ढवळ्या चाललेल्या या कारभारावर स्थानिक लोकनेते, तसेच या भागातील महसूल खात्याचे अधिकारी दिसत असताना आंधळेपणाचे सोंग घेऊन मूक गिळून गप्प बसले आहेत,

एकंदरीत प्लॉटिंग व्यवसायांच्या कारणामुळे पर्यावरणाची व निसर्गाची खूप मोठी भविष्यात न भरून येणारी हानी होणार आहे, त्यामुळे महसूल खात्याने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने या प्लॉटिंग व्यवसायावर कारवाई करून बंद करावी अशी मागणी परिसरातून होत आहे,