बी जे एस विद्यालयामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
हवेली प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर
माहिती सेवा समितीचे हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरट यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त अतिरिक्त खर्च टाळून भारतीय जैन संघटनेच्या वाघोली (तालुका हवेली) येथील विद्यालयामध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे,
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या हेतूने अग्निशामक दलाचे निवृत्त अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना खेळ भावना जोपासण्यास मदत व्हावी या हेतूने खेळाचे साहित्य भेट देऊन समाजसेवेचे वेगळे दर्शन घडविले असून
याप्रसंगी माहिती सेवा समितीच्या माध्यमातून वर्षभरामध्ये पर्यावरण वाढीसह स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी वारीच्या वाटेवर वृक्षारोपणासाठी वारकऱ्यांना बिया वाटप अशी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जात असून माहिती सेवा समितीचे हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरट यांनी गरजू विद्यार्थ्यांची गरज ओळखून नवीन सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले,
तसेच उपप्राचार्य गेठे सरांनी विद्यालयाचे माजी विद्यार्थी कमलेश बहिरट यांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या या आगळ्यावेगळ्या भेटीबद्दल बहिरट यांचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या
माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यासह विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी उपप्राचार्य पोपटराव गेठे, माहिती सेवा समितीचे पुणे उपजिल्हाध्यक्ष गणेश जाधव तालुकाध्यक्ष कमलेश बहिरट निवृत्त अधिकारी अग्निशामक दल शिवाजीराव चव्हाण,विक्रम गडदे भारतीय जैन संघटना वाघोली प्रकल्प व्यवस्थापक बापू साळुंके, श्री.खाडे एस.जी,श्रीकांत जाधव , श्री अंधारे विजय , श्री.क्षीरसागर जी. व्ही., श्री पासलकर सर. प्रा. सिंग मॅडम विद्यार्थी प्रांजल ढेकणे ऋतुजा गव्हाणे आर्या आव्हाळे यासह शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
