वाघोलीतील दगडखाण कामगार वस्त्यांतील समस्यांबाबत मनपा अधिकाऱ्यांची पाहणी
सुनील भंडारे पाटील
दगडखाण कामगार विकास परिषदेच्या नियोजीत ‘बोंबाबोंब’ आंदोलनाच्या निवेदनाची दखल घेऊन गायरानजमीनीवर पिढ्यान पिढया राहणाऱ्या दगडखाण कामगार वस्त्या वाघेश्वरनगर, बुरुंजवाडी, सुयोगनगर, गाडीतळवस्ती व ढोमखेलरोड वस्त्यातील कष्टकरी कामगर वस्ता मूलभूत सोयी सुविधा पासून वर्षानुवर्षे वंचित राहिले आहेत.
वाघोलीचा मनपात समावेश होऊन चारवर्षाहून अधिक कालखंड झाला मात्र आता पर्यत या वस्त्यांना मनपा कडून कोणत्याही मुलभूत सुविधा देण्यात आल्या नाहीत.
पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते, ड्रेनेज व्यवस्था नसल्या सारखी आहे. सार्वजनिक स्वच्छालये मोडकळलेल्या अवस्थेत व स्वच्छता विभागाचे पूर्णतः दूर्लक्ष. परिसरात कचरा व दुर्गधींचे सामराज्य आहे.
मनपाचे आरोग्य निरीक्षक सचिन लडकत, कनिष्ठ आरोग्य निरीक्षक राजेश शेवरे यांनी परिषदेच्या मागणीनुसार कामगार वस्तीतील दुरावस्थेची पाहणी केली. शौचालयाची झालेली दयनीय अवस्था, ठीक ठिकाणी साचलेला कचऱ्याचा ढीग, तुंबलेली गटारे व ओव्हर फ्लो होत असलेली चेंबर्स, अनेक ठिकाणी सांडपाण्याचा निचरा न झाल्याने घाणीचा प्राधूर्भाव अशा अनेक समस्यांचा आखो देखा हालकथन केला,
या सर्व समस्यामुळे लहान मुले, वृद्ध, आजारी असणाऱ्या व्यक्ती याबरोबरच सर्वच कामगार त्रस्त असल्याने स्वच्छता ताबडतोब करण्याची विनंती करण्यात आली. अधिकारी वर्गाने काही दिवसातच सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
प्रसंगी गायरान क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नाबाबत रचणात्मक संघर्षमय कार्यकरणारे करणारे अँड. पल्लवी रेगे व अँड. बी. एम. रेगे यांचे बरोबर मर्याप्पा चौगुले, गणीभाई सय्यद शिवाजी पात्रे, संदीप मोरे, रामेश्वर कारके, शिवाजी तांबे, घुले, पांचाळ, मोठ्या संख्येने महिला व कामगार पाहणी दरम्यान सहभागी होऊन अधिकाऱ्यांसमोर त्यांच्या समस्या मांडल्या.
