श्री रामचंद्र इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जल्लोष 2025 विभागीय युवक महोत्सव
सुनील भंडारे पाटील
श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये उत्साहामध्ये संपन्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी विकास महामंडळाच्या वतीने घेतला जाणारा जल्लोष 2025 विभागायीय युवक महोत्सव सलग तिसऱ्यांदा आयोजनाचा मान श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालय लोणीकंद यांना मिळाला जल्लोष स्पर्धेचा पहिल्या सत्रात उद्घाटन सोहळा पार पाडला,
यावेळी महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक तसेच क्रीडा संचालिका डॉ.सुषमा तायडे यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविक परिचयामध्ये विविध महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी स्पर्धक संघाचे आणि संघ समन्वयक ते तसेच स्पर्धक परीक्षक मान्यवरांचे आपल्या दिलखुलास शैलीतून परिचय करून दिला,
या कार्यक्रमात 20 महाविद्यालयातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांनी पाच विविध कला प्रकारात सहभाग नोंदवला आहे ,श्रीरामचंद्र एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक सचिव शंकर रामचंद्र भूमकर त्यांनी जल्लोष 2025 हिवाळी युवक महोत्सवाचे या स्पर्धेचे उद्घाटन केले ,
या उद्घाटन प्रसंगी शंकर रामचंद्र भूमकर यांनी कॉलेज जीवनाच्या कलागुणांचा विविध जाणीवांची व्यवहारांशी जगण्याच्या सहसंबंध लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व आपल्या सुप्त शक्तीला जागृत करून आपली इच्छाशक्ती प्रबळ करा आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात मोठे व्हा नावलौकिक मिळवा हा संदेश त्यांनी आपल्या उद्घाटनिय मनोगततून स्पर्धकांना दिला व पुढील स्पर्धेसाठी स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा दिल्या ,
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे खजिनदार उद्धव रामचंद्र भूमकर प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य व बीजीएस कॉलेजचे डॉ रमेश गायकवाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश देसाई ,डॉ माधुरी देशमुख मॅडम सिद्धांत शंकर भुमकर टेक्निकल डायरेक्टर महाविद्यालयाचे विकास महामंडळाचे अधिकारी तृप्ती फरांदे या उपस्थित होत्या,
यानंतर संध्याकाळी झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ अभिजीत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून जल्लोष ची मनावर पडलेली भुळ खूप छान पद्धतीने विद्यार्थी कलावंतांसमोर व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या, स्वतः कुलकर्णी सर हे विज्ञान शाखेचे विद्यार्थी शिवाय सतत वैज्ञानिक अंगाने प्रयोगशील असलेले कुलकर्णी सर कलेच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जल्लोष सहवासात आल्यापासून कसे रंगले हे हृदय स्पर्धेत अनुभव कथन अतिशय मुश्किल पूर्ण शैलीत केले ,
डॉ. संजय पालवे सदस्य मॅनेजमेंट कौन्सिलिंग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी आपल्या मनोगत्वातून स्पर्धकांना स्वतः सुखमय अशा पद्धतीने स्पर्धेत सहभाग घ्या आणि यशस्वी व्हा अशा शुभेच्छा दिल्या,स्पर्धेसाठी स्पर्धा व्हावी आणि या स्पर्धेतून अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विजयाची ढाल आपल्या सांस्कृतिक पुणे शहराला मिळावी अशी आशा व्यक्त केली,
या स्पर्धेमध्ये विजयी त्या ठरलेल्या वैयक्तिक व सांघिक संघाला पारितोषिक तसेच मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश देसाई यांच्या पाठबळातून व मार्गदर्शनातून महाविद्यालयीन विभाग प्रमुख व प्राध्यापक वृंद कार्यालयीन कर्मचारी सेवक यांच्या परिश्रमातून जल्लोष 2025 अतिशय उत्साहाने श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर परीक्षक व स्पर्धक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते,
