कोरेगाव भीमा येथील वैभव ढेरंगे यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड
गावात उत्सवाचे वातावरण, तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श
कोरेगाव भीमा गावच्या शिरपेचात मानाचा तुरा
सुनील भंडारे पाटील
ग्रामीण भागात कोणत्याही भौतिक सुविधा नसताना वैभव भाऊसाहेब ढेरंगे यांनी शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेत प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक अडचणींवर मात करत राज्यकर निरीक्षक या पदावर मिळवलेली निवड ही अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामिण भागातील तरुणांनपुढे आदर्श निर्माण झाला असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य पि.के. गव्हाणे यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील वैभव भाऊसाहेब ढेरंगे यांनी राज्यकर निरीक्षक या पदावर मिळवलेली निवड ही अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य पि.के. गव्हाणे, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, माजी घोडगंगा कारखान्याचे संचालक कैलासराव सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, राष्ट्रवादीचे नारायणराव फडतरे, सरपंच संदीप ढेरंगे, सोसायटीचे माजी अध्यक्ष बबनराव गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, भाऊसाहेब ढेरंगे, पोलीस उपनिरीक्षक घावटे, शंकर गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्या वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, रेखा ढेरंगे, कोमल खलसे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजाराम ढेरंगे यांनी सांगितले कि, ग्रामीण भागातील वैभव ढेरंगे यांनी शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतला होता. मर्यादित साधन सामग्री, प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी चिकाटीने अभ्यास केला. सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी प्रतिष्ठित अशा राज्य कर निरीक्षक पदावर आपले नाव कोरले असून आम्हाला त्याचा अभिमान वाटतो असे सांगितले.
वैभवचे यश हे गावचा नावलौकिक वैभवने लहानपणापासूनच शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले होते. घरातील परिस्थिती सोपी नव्हती, पण त्याने ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने प्रयत्न केले. आज त्याचे स्वप्न साकार झाले असून वैभव चे यश हे गावचे नावलौकिक करणारे असल्याचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेने केला सन्मान कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शिकलेला वैभव हा अभ्यासू, जिद्दी आणि ध्येयवेडा विद्यार्थी होता. त्याच्या या यशामुळे शाळेतील मुलांना प्रेरणा मिळेल,” असे तुकाराम सातकर यांनी सांगितले.
तरुणांसाठी आदर्श वैभव ढेरंगे यांचे यश हे ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या यशातून प्रोत्साहन मिळणार असून, चिकाटी व सातत्यपूर्ण परिश्रमाने अशक्य वाटणारे ध्येयही साध्य करता येते, हा संदेश त्यांनी आपल्या कामगिरीतून दिला असल्याचे कैलासराव सोनवणे यांनी सांगितले.
