ब्रेकिंग…! शिक्रापूर मध्ये एन्काऊटर परिसरात खळबळ
आरोपीच्या छायाचित्रांमध्ये हातात तलवार दिसत आहे
सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (तालुका शिरूर) येथे मलठण फाटा परिसरात आज शनिवार सायंकाळी साडेसातच्या सुमारास सातारा तसेच शिक्रापूर पोलीस आणि पोलिसांच्या हिटलिस्टवर असणारा आरोपी मध्ये चकमक होऊन अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला त्यामध्ये आरोपीचा मृत्यू झाला,
याबाबतची माहिती अशी की, आरोपी लखन भोसले याला पकडण्यासाठी प्रयत्न असणारे सातारा पोलीस शोधत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्या सहकार्यातून लखन भोसले याला पकडण्याच्या प्रयत्नात असताना त्याने सुजित भोसले याच्यावर चाकूने वार केला या हल्ल्यात स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांनी लखन याच्यावर फायरिंग केली त्यामध्ये तो जखमी झाला,
त्याला उपचरासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, या घटनेची माहिती शिक्रापूर तसेच परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली, घटनास्थळी शिरूर तालुक्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली पाहणी करून घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले,
पुढील तपासासाठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गंभीरघटनेचा तपास चालू केला आहे,
या घटनेमुळे शिरूर तालुका तसेच शिक्रापूर परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून कायदे व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, सर्वसामान्य माणसांनी नक्की करायचे काय? महाराष्ट्राचा युपी बिहार झाला का काय? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे,
