March 30, 2026
पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर
एकूण ४१ प्रभाग; १६५ नगरसेवक; प्रभाग क्रमांक ३८ हा ५ सदस्यीय तर उर्वरित ४० प्रभाग ४ सदस्यीय.

सुनील भंडारे पाटील
आगामी महापालिका निवडणुकीबाबत पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेने आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली असून एकूण ४१ प्रभाग असणार आहेत.

एकूण ४१ प्रभाग असून त्यात १६५ नगरसेवक असतील. प्रभाग क्रमांक ३८ हा ५ सदस्यीय तर उर्वरित ४० प्रभाग ४ सदस्यीय असतील. महापालिका निवडणुकीसाठी पुणे महानगर पालिकेकडून प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे.

यामध्ये आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभाग असणार आहेत. यामध्ये ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असणार आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या २०११ चे जनगणनेनुसार ३४,८१,३५९ इतकी असून अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६८,६३३ इतकी आहे.

तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ इतकी आहे. तसेच निवडून द्यायच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या १६५ आहे. एकूण ४१ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक ३८ हा ५ सदस्यीय असून उर्वरित ४० प्रभाग ४ सदस्यीय आहेत.

प्रारूप प्रभाग रचनासंदर्भात नागरिकांच्या हरकती-सूचना २२ ऑगस्ट २०२५ ते सप्टेंबर २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पुणे मनपा भवन स्वागत कक्ष, पुणे मनपाची सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि निवडणूक कार्यालय, स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर भवन या ठिकाणी लेखी स्वरुपात स्वीकारण्यात येतील, असे पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

वाघोली-खराडी प्रभाग-४ ची एकूण लोकसंख्या
वाघोली-खराडी-४ प्रभाग मध्ये काळुबाई नगर केसनंद रोड, विठ्ठलवाडी, बीजेएस कॉलेज, वाघोली गावठाण, खाणीचा रस्ता, स्वप्नपूर्ती, आरएमसी गार्डन बायरोड, चौधरी वस्ती, एकनाथ पठारे वस्ती, यशवंत नगर, अशोक नगर, श्री पार्क सोसायटी, खराडी आयटी पार्क, तुळजाभवानी नगर, राजाराम पाटील नगर, चोखीदानी, सातव पाटील स्पोर्ट्स, कोहिनूर, उबाळेनगर, राजाराम अपार्टमेंट, युवॉन आयटी पार्क, ढोले पाटील, खराडी गाव पूर्ण, चुलबुल धाबा, तुकाराम नगर, एकनाथ पठारे, वस्ती खुळेवाडी, चंदननगर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आदींचा समावेश आहे. एकूण ९२२८३ लोकसंख्या असून पैकी एसी १२८८१ तर एसटी १०३७ आहे.

लोहगाव-विमाननगर प्रभाग क्रमांक-३ ची लोकसंख्या सोमनाथ नगर, साकोरे नगर, विमाननगर, गंगा हॅम्लेट सोसायटी, संजय पार्क, पुरु सोसायटी, जयप्रकाश नगर, इंदिरानगर, ब्रम्हासेल, पुणे एअरपोर्ट परिसर, एअरपोर्ट कॅम्पस, महाडा कॉलनी, राजीव नगर, गुरुद्वारा, संतनगर, मारिया उद्यान, मोझे चाळ, तुकाराम महाराज मंदिर परिसर, लोहगाव आठवडे बाजार, हॉलीओक सिटी सोसायटी, पठारे वस्ती, आदर्श नगर, जनार्दन नगर, लेक व्ह्यू सिटी, भारती विद्यापीठ शाळा, हरण तळे, सोपान नगर, कर्मभूमी नगर, दादाची वस्ती, पाटील वस्ती, डिफेन्स कॉलनी, योजना नगर, त्रिमूर्ती लॉन्स, पवार वस्ती, काळुराम खांदवे नगर, माळवाडी, डायमंड वॉटर पार्क, वाघमारे वस्ती, वृंदावन पार्क, विखे पाटील स्कूल, ज्वाला रेसिडेन्सी, पुणे डॉग पार्क, रोहन अभिलाषा, मोतीलाल धूत गॅरेज, डी मार्ट परिसर, सुयोग स्कूल, रामनगर, जगताप वस्ती, धनगर बाबा मंदिर, बावडी रोड, न्यू राजगड सोसायटी, वाघेश्वर मंदिर परिसर, मथुरा स्वीट, संस्कृती स्कूल, ज्ञानदा गुरुकुल, ओम वेअर हाऊस, कटके वस्ती, आमदार निवास, अहिल्या नगर कडे जाणारा डावीकडील भागाचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक-३ ची एकूण लोकसंख्या ९२४१० असून पैकी एसी १००८२ तर एसटी १०१७ आहे.

कळस-धानोरी-लोहगाव प्रभाग क्रमांक-१
कळस, धानोरी ,विश्रांतवाडी, मुजाबा वस्ती, खेसे पार्क, कलवड, लोहगाव बस स्टॉप, जुनी ग्रामपंचायत ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, चिरके कॉलनी, रागपसरे वस्ती, चिन्मय ट्रस्ट, ब्रिलियंट स्कूल, वडगाव शिंदे ला जाणारी डावी बाजू, खंडोबा माळ परिसर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, निरगुडी रोड, डिफेन्स कॉलनी, अजिंक्य डी वाय पाटील कॉलेज रोड, निंबाळकर नगर, मोजे नगर, सिताई पार्क, साई समृद्धी पार्क, निंबाळकर नगर, नवीन जे डे गाथा बिल्डिंग, पोरवाल रोड, साठे वस्ती, स्वामी समर्थ नगर, साठे नगर, गीताई लॉन्स परिसर, सिद्धार्थ नगर माधवनगर, तुषार पार्क, भारत माता रोड परिसर, मारतो फिलिप्स स्कूल, अग्निशमन केंद्र परिसर, कलवड, केसे पार्क, एअर फोर्स कॉलनी, तिरुपती वसंतम, विठ्ठल मंदिर परिसर, धानोरी गावठाण, लक्ष्मी नगर सोसायटी, परांडे नगर, गोकुळ नगर, दत्तनगर, हरे कृष्ण पार्क, मुंजाबा वस्ती, चौधरी नगर, आकाश पार्क, भैरव नगर, काशिनाथ नगर, आनंद पार्क, भीम नगर, अंबा नगरी, कळस, सर्वे नंबर १११ व ११२, ग्रेप सोसायटी आदींचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक-१ ची एकूण लोकसंख्या ९२६४४ असून पैकी एसी १८०१० तर एसटी २२७४ इतकी आहे.