March 30, 2026
श्री रामचंद्र इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये इंडक्शन प्रोग्राम -2025 चे प्रदीप दादा कंद यांचे हस्ते उद्घाटन

श्री रामचंद्र अभियांत्रिकी (डिप्लोमा /पॉलीटेकनिक ) महाविद्यालया च्या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा “इंडक्शन प्रोग्राम -2025” चे उदघाटन प्रदीप दादा कंद व  सर्जेराव थोरात यांच्या हस्ते मोट्या थाटात संपन्न

सुनील भंडारे पाटील

श्री रामचंद्र अभियांत्रिकी (डिप्लोमा /पॉलीटेकनिक ) महाविद्यालया च्या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा ” इंडक्शन प्रोग्राम -2025″ चा उदघाटन समारंभ 20/08/2025 रोजी मोट्या थाटात पार पडला .

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ,PDCC बँकेचे संचालक तसेच पुणे जिल्हा भा.जा.पा. चे अध्यक्ष प्रदीप (दादा) विद्याधर कंद, लोणीकंद पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार , P.E. सोसायटी चे सहसचिव ,CDC मॉडर्न महाविद्यालयाचे अध्यक्ष सुरेश तोडकर, तसेच महाविद्यालयाचे संस्थापक सचिव शंकरकाका रामचंद्र भूमकर, खजिनदार उद्धव रामचंद्र भूमकर, टेकनिकल डायरेक्टर  सिद्धांत शंकर भूमकर , डिप्लोमा समन्वयक आकाश सोमनाथ चौरे हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरवस्ती पूजन आणि दीप -प्रज्वलन करून मान्यवरांनी केली व नंतर प्रथम वर्षांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे स्वागत आणि सत्कार मान्यवरांच्या हस्ते कारणात आला.

महाविद्यालातील प्रा. आकाश सोमनाथ चौरे सरांनी कार्यक्रमाची प्रस्थावना करताना महाविद्यालयाचे गेल्या तेरा वर्षांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आलेख ,विद्यालयात विध्यार्त्यांच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, विध्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले तांत्रिक प्रशिक्षण त्यातून मिळणारऱ्या रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी,महाविद्यालय सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, भव्य वाचनालय, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली.

तसेच शंकर (काका) भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा महाविद्यालयाचा मागील वर्षाचा उज्ज्वल निकाल,आणि विध्यार्थानी विविध खेळांमध्ये मिळवलेले विशेष यश आणि प्राविण्य अदोरेखित केले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार राबवण्यात येणारा अभ्यासक्रम व त्याचे फायदे प्रवेशित विद्यर्थ्यांना आणि पालकांना समजावून सांगितले तसेच स्टूडेंट इंडक्शन कार्यक्रमामध्ये दोन आठवड्यामध्ये घेण्यात येणारे व्यक्तिमत्व विकास, विशेष गुणवैष्ट्ये, योगा आणि चिंतन, खेळ, इंडस्ट्रियल सहली इ. यांचा समावेश करून त्यांचा सर्वांगीण विकास करून तंत्रशिक्षणाची आवड निर्माण करून त्यांची प्रगती साधण्याचा एक प्रयत्न असतो ज्यामुळे विद्यार्थी त्यांच्या कुटुंबांशी आणि महाविद्यालयातील विस्तारित कुटुंबाशी जोडले जातात जेणेकरून ते त्यांना येणाऱ्या कोणत्याही अडचणींवर अगदी सहज शिक्षकांच्या मदतीने मात करून यशस्वी होऊ शकतात असे विचार व्यक्त केले.

प्रदीपदादा कंद यांनी पालक व विद्यार्थाना मुलांच्या भविष्याचा विचारकरूनच करियर निवडीचा निर्णय घ्यावा व तो तडीस घेऊन जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून प्रयन्त करावे व येणाऱ्या काळात महाविध्यालाचे नाव शिखरावर घेऊन जावे अशी आशा आणि शुभेच्या दिल्या त्याचबरोबर भूमकर कुटुंबाने मोट्या मेहनतीने हे विद्यालय उभे करून परिसरातील शेतकरी व कष्टकरी परिवारातील मुलं-मुलींना अगदी माफक फी मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ करून जोपासत असलेल्या शैक्षणिक परंपरेचे व सेवेचे तोंड भरून कौतुक आणि अभिमान असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले,

लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधताना दहावीनंतर व्यक्तिमत्व घडण्याचे आणि बिघडण्याचे वय असते त्याकारणास्तव विध्यार्थानी सोसिअल मेडिया चा अतिरिक्त वापर टाळावा व पुस्तकांचा वापर करून वाचनाची आवड निर्माण करावी ज्यामुळे त्यांच्या वैचारिक वृद्धीत वाढ होते आणि भविष्यात मोठया शासकीय पदावर जाण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करता येते याचबरोर मोबाईलच्या वापरामुळे विध्यार्थी दशेत नकळत होणारे गुन्हे आणि त्यासाठी शासनाचे कडक नियम व कायदे विध्यार्थाना आणि पालकांना सांगून त्याचे प्रबोधन केले.

कार्यक्रमासाठी उपस्थित गुरुवर्य सुरज तोडकर सरानी विध्यार्थ्यांना संबोधीत करताना सांगितले कि विद्यार्थ्यांनी त्याचे काम स्मार्ट करावे येणार काळ हा डिजिटल आणि तांत्रिक शिक्षणाचा आहे त्यामुळे विद्यार्त्यानी शिक्षणाचे महत्व समजून मेहनत घेतली तर यश मिळते आणि त्याचा उपयोग देशसेवेसाठी करून सुजाण नागरिक असल्याचे कर्तव्य पार पडता येते असे मत मांडले.

शंकर काका भूमकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील आहे. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याने आपली क्षमता ओळखून तिचा योग्य वापर करावा व संघर्ष हेच यशाचे गमक असल्याचे सूत्र त्यांनी विध्यार्थ्यांना दिले आणि संघर्ष करायला कोणतीही पळवाट नसून तुमच्या संघर्षात महाविद्यालय आणि स्वतः तुमच्या पाठीशी आहे फक्त तुम्ही प्रामाणिकपने अभ्यास करून आपल्या आई-वडिल्यांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसून मेहनत करून अभ्यास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली, तसेच मागील वर्षी दिलेल्या उत्कृष्ट निकालाबद्दल शिक्षकांचे कौतुक केले आणि शाबासकीची थाप दिली व या यशाची पुनरावृत्ती करावी अशी सदिच्छा व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. बोरुडे भीमराव (स्थापत्य ),प्रा. सय्यद गुलनाझ (संगणक ), प्रा. बोलाडे रमेश (यांत्रिकी ), प्रा. गुणवरे रामकृष्ण (विदयुत), प्रा.विकास गायकवाड,प्रा.सागर शिंदे, महादेव गोडसे , महेश खरपुडे, आणि सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्नेहल दिवटे यांनी केले व मान्यवरांचे ,विद्यार्थी -पालकांचे आणि उपस्थितांचे आभार प्रा.अक्षय खापेकर यांनी मानले.