ब्रेकिंग…! बनावट ग्रामसभा प्रकरणी रोहिदास दामोदर उंद्रे सह अन्य २ आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला”
सुनील भंडारे पाटील
मांजरी खुर्द (ता. हवेली) जि. पुणे येथील ग्रामपंचायतीमध्ये बोगस व बनावट ग्रामसभा दाखवून एका संस्थेची मिळकत तसेच १ हेक्टर सरकारी गावठाण जमीन बळकावले प्रकरणी संदीप उंद्रे यांच्या तक्रारीवरून
तसेच मा. उच्च न्यायालयाकडील आदेशावरून एकूण ९ आरोपींविरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि.नं.०१६७/२०२५ भारतीय दंड संहिता १८६० कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी रोहिदास दामोदर उंद्रे व इतर यांनी पुणे येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. प्रस्तुतचा जामीन अर्ज फेटाळणे या बाबत वाघोली पोलीस स्टेशनच्या वतीने सरकारी वकिलांनी युक्तिवाद सादर केला होता.
आरोपी तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून पुणे येथील मे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपी रोहिदास दामोदर उंद्रे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी रामदास शिवराम उंद्रे व विठ्ठल सुभाष सावंत यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
आरोपी यांच्या विरुद्धच्या आरोपांकडे पाहता, त्यांची भूमिका प्रथमदर्शनी मोठी आणि गंभीर दिसते. त्यामुळे तपशीलवार चौकशी करण्यासाठी त्यांची कोठडीतील चौकशी आवश्यक वाटते’…..सत्र न्यायालय….!
“सत्ता, पैसा व राजकीय दबाव निर्माण करून घोटाळे करणाऱ्या पुढाऱ्यांना कायद्याची जरब बसणे आवश्यक होते. मा. सत्र न्यायालयाने अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवून आरोपी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीना अटक करून मा. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे”तक्रारदार …संदीप उंद्रे…!
