रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
येथील औद्योगिक वसाहतीमधील केके नाग या कंपनीमध्ये पत्रा बसवणाऱ्या कामगाराचा उंचावरून पडून मृत्यू झाला असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक १० जुलै रोजी विठ्ठल सिताराम कदम ( वय २१) राहणार काळूस तालुका खेड हा कंपनीच्या गोडाऊन ला पञा बसविण्याचे काम करत होता. मात्र वेगाने आलेल्या वाऱ्याने तोल जाऊन तो खाली पडला असता त्याला रुग्णालयात दाखल केले आसता उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या बाबत तुकाराम कदम यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल कदम हे रविवार दिनांक १० जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या गोडाऊन चा पत्रा बसवण्याचे काम करत होते मात्र वेगाने आलेल्या वाऱ्यान तोल जाऊन विठ्ठल कदम हे खाली कोसळले त्यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली उपचारासाठी शिरुर येथील खाजगी रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे हे करत आहे,

