March 30, 2026
 
शिरूर विशेष प्रतिनिधी 
            शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे सोमवारी रात्री दोन कृषी सेवा केंद्र फोडून दुकानातील मिळेल ती रोख रक्कम घेवून चोरट्यांनी पोबारा केला आहे .        

  टाकळी हाजी येथील रोहन कृषी सेवा केंद्र व गहिनीनाथ कृषी उद्योग येथील पत्रा खोलून आत प्रवेश केला व ड्रावर मधील रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. या दुकानदारांनी अंदाजे रुपये एक हजार पर्यंत रक्कम असेल असे सांगितले आहे.

         याच भागातील ही खते औषधांची दुकाने फुटण्याची ही तिसरी वेळ आहे . एप्रिल, मे महिन्यात ही अशाच प्रकारे दुकाने फुटली होती , त्यावेळी ही चोरांना जास्त काही हाती लागले नव्हते तरीही हीच  दुकाने का लक्ष केली जातात हे मात्र विचार करायला लावणारी गोष्ट आहे. 

       काही ठिकाणी कॅमेरे असल्याने  सी सी टी व्हीं फुटेज उपलब्ध झाले आहे. अवघ्या काही सेकंदात चोरी करून चोरटे पसार होत आहेत  असे प्रकार घडू लागल्याने व्यवसायिक तसेच रहिवाशी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना आव्हान देणाऱ्या घटना घडत असल्याने या भागासाठी पोलिस व नागरिकांना तत्पर राहावे लागणार आहे.

           इतर दुकानदारांनी आपल्या आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत तसेच बुधवारी संध्याकाळी सर्व दुकानदारांची टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्र येथे मीटिंग घेवून स्वसंरक्षण व दक्षता घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे….. सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर