March 30, 2026

सुनील भंडारे पाटील
           समाजामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रसार माध्यम, पत्रकारितेला खूप महत्व आहे, काळाच्या ओघामध्ये सुधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरपूर आधुनिकता आलेली आहे,          

परंतु पूर्वीची पत्रकारिता आता राहिली आहे का? हे खूप मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे कारण पूर्वीच्या काळी घटनास्थळी जाऊन बातमी घेणे, शहानिशा करून, पत्राद्वारे, त्यानंतर फॅक्स द्वारे, आता ई-मेल द्वारे पाठवण्यामध्ये बदल घडत गेले, आज घडलेली घटना पेपर मध्ये वाचण्याची दोन दिवसांनी तीन दिवसांनी देखील लोकांना आतुरता असायची, आता ते राहिले नाही, सोशल व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून  जगात घडलेली घटना काही क्षणात माहिती होते, टेक्नॉलॉजी बरोबर पत्रकारांची धावपळी वाढली आहे, त्यातच प्रत्येकाला बातमी देण्याच्या उत्सुकतेमध्ये बातमी राहून गेली तर, वरून जाहिरात गेली तर, जाहिरातीचे काम कमी झाले तर, डायरेक्ट हकालपट्टी, अशी पत्रकारिता बिनबुडाची झाली आहे,   

प्रसार माध्यमांच्या बातम्या व जाहिरातीच्या अति ताणामुळे पत्रकारांच्या आरोग्याचा देखील गंभीर प्रश्न तयार झाला आहे, त्यामुळे खरी पत्रकारिता ही फक्त नावापुरती राहिली काय? सामाजिक प्रश्न असो, शासकीय तसेच इतर सर्व प्रश्नांंबाबत मुक्त पत्रकारिता गरजेची असताना मात्र समाजामध्ये मुक्तपणे काम करणाऱ्या पत्रकारावर मात्र बऱ्याचदा  अनेकांवर अन्याय होताना दिसतो, म्हणून खरे व सत्य विचार मांडण्यासाठी आजच्या कलियुगामध्ये खरंचच मुक्त पत्रकारिता गरजेची आहे,