March 30, 2026
लोणी काळभोर अनिकेत मुळीक 
        छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. यांपैकीच एक म्हणजेच वीर बाजीप्रभू देशपांडे. सिद्दी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवराय सुखरूप विशालगडावर पोहोचावेत म्हणून बाजीप्रभूंसह ३०० मावळ्यांनी घोडखिंडीत हजारो गनिमांना रोखून धरलं. त्यांच्या बलिदानानं घोडखिंड पावनखिंड झाली. वीर बाजीप्रभूंच्या पुण्यतिथीनिमित्त लोणी काळभोर पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे मुख्याध्यापक प्रा. गवळी सर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.           

वृक्षारोपण करूण एक आगळीवेगळी आदरांजली पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ग्रीन फाऊंडेशनने वाहिली..स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्र ही संकल्पना ग्रीन फाउंडेशनकडून राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने हवेली तालुक्यात विविध ठिकाणी  पर्यावरण पुरक कार्यक्रम हाती घेतले जात असून ठिकठिकाणी ‘स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण करण्यात येत आहे,      

वीर बाजीप्रभू देशपांडे  यांच्या पुण्यतिथी निमित्त लोणी काळभोर पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल च्या परिसारामध्ये पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल ज्युनियर कॉलेज व ग्रीन फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. या वृक्षारोपणाचा शुभारंभ ॲड .श्रीकांत भिसे साहेब यांच्याहस्तें. करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सर्व शिक्षक व मुख्याध्यापक , ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, विभा गिरिश ट्रस्ट उपस्थित होते.