March 30, 2026
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
         अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे  यांच्या संकल्पनेतून आणि जगदंब प्रतिष्ठान आयोजित भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. 

या शिबीरास रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करणारा दात्यास आजीवन मोफत रक्त,नातेवाईकांना १ वर्ष मोफत रक्त तसेच ६ लक्ष रुपयांचा मोफत विमा देण्यात येणार आहे.रांजणगाव एम आय डी सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या हस्ते उदघाट्न झालेल्या या शिबीराला खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आवर्जून भेट देत शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष .मानसिंग पाचुंदकर पाटील यांचे आभार मानले

            .यावेळी खंडोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री.शिवाजीमामा शेळके,आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री.मानसिंग पाचुंदकर पाटील, मा.जिल्हा परिषद सदस्या.स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील , पुणे जिल्हा परिषदेचे मा.सदस्य .शेखर पाचुंदकर पाटील,खरेदी विक्री संघांचे संचालक  दत्तात्रय कदम, रांजणगावचे लोकनियुक्त सरपंच सर्जेराव खेडकर , 
निमगाव भोगीचे सरपंच उत्तम व्यवहारे ,
 आत्माराम खेडकर ,  दिलीप खळदकर , 
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल घोडेराव,डॉ.महेश सातव,यांसह रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचे आजी-माजी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन, संचालक,तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर,आरोग्य सेविका,आशा वर्कर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 रांजणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर रक्तदान शिबिराचे नियोजन मानसिंग पाचुंदकर-पाटील मिञ परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात एकुण १७१ बाटल्या रक्त संकलन झाले.