रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
रांजणगाव गणपती (तालुका शिरूर) येथे एमआयडीसी पोलीस स्टेशन च्या वतीने ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी .यशवंत गवारी व रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे , महिला पोलीस अधिकारी शुंभागी कुटे , पोलीस कर्मचारी ब्रम्हा पवार , संतोष औटी , विलास आंबेकर , मुश्ताख शेख, सरजिने , रघुनाथ. हळनोर , माणिक काळकुटे , विजय सर्जिने , वैभव मोरे , राजु वाघमोडे , विनायक मोहिते , आबासाहेब नाईक , सुरज बडेकर , पोलीस मित्र नवनाथ पेठे , वैभव तरवडे , साहेबराव हंबर्डे यांसह रांजणगाव एमआयडीसी कार्यक्षेञातील पोलीस पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष , सरपंच यांसह विविध मान्यवरांनी रक्तदान केले असुन या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १०० हुन रक्ताच्या बाटल्या संकलन झाल्या.
सदर रक्तदान शिबिरास मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर यांचा वैद्यकीय स्टाप तेजस मोरे , समाधान देशमुख , सुजाता गायकवाड , सत्यजित गायकवाड , नामदेव चौरे , विजय भोसले , विकास कांबळे यांनी विशेष सहकार्य केले तसेच रक्तदात्यांना लस्सी , ज्यूस , मिल्क आदी ची व्यवस्था प्राध्यापक संजीव कुमार नरवडे यांच्या ओनस डेरी फार्म यांच्या वतीने करण्यात आली. तर टाटा बॅटरी कंपनी च्या वतीने नाष्टा व फळांची व्यवस्था करण्यात आली सर्व रक्तदात्यांचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांनी आभार मानले.

