शिरूर विशेष प्रतिनिधी
टाकळी हाजी तालुका शिरूर येथे छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या शिरूर तालुका कार्यकारिणी ची निवड संघटनेचे महाराष्ट्र राज्य आरोग्य आघाडी चे प्रदेशाध्यक्ष शांताराम गायकवाड, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय चौधरी, नगर जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप औटी, पारनेर तालुका उपाध्यक्ष गवाराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामूआण्णा घोडे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोविंद गावडे,अक्षर गणेशा चित्रकार ज्ञानेश्वर कवडे सर, पांडुरंग वरखडे, गणेश कसबे, वसंत सदाफुले, मुन्ना पवार उपस्थित होते.
सोमनाथ सखाराम वरखडे – शिरूर तालुका अध्यक्ष
जयदीप गेणभाऊ वरखडे – शिरूर तालुका उपाध्यक्ष
मोहन प्रभू घोडे – शिरूर तालूका सचिव
सोमनाथ दादाभाऊ साठे- शिकर तालुका संपर्क प्रमुख
योगेश एकनाथ साळवे टाकळी हाजी शहर अध्यक्ष
आकाश सुरेश गुंजाळ – टाकळी हाजी शहर उपअध्यक्ष
२० ऑगस्ट रोजी पैठण येथे राज्यव्यापी भव्य अधिवेशन आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


