March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी अनिकेत मुळीक 
        हवेली तालुक्यातील लोणी काळभोर हे राजकारणातील सर्वात प्रसिद्ध गाव आहे .येथे नेहमीच सण, उत्सव,सभा,नेते मंडळींन ची चढा ओढ लागलेली असते. सागर अशोक काळभोर  आयोजित आखिल लोणी काळभोर दही हंडी उत्सव साजरा झाला. लोणी गावातील खोकलाई देवी चौक, या ठिकाणी दहीहंडी फोडली. ४० ते ४५ गोविंदानी सहा थर रचून लोणी काळभोर खोकलाई देवी चौक येथील दहीहंडी फोडण्यात बारामती येथील जय मल्हार पथकाने यश मिळवले.   

बाळगोपाळ श्रीकृष्णाच्या जन्मानिमित्ताने दहीहंडी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.

दहीहंडी उत्सवाचे नियोजन यावेळी सागर अशोक काळभोर, दिग्विजय शरद काळभोर,जयदीप काळभोर,यांनी पार पाडले.
प्रमुख उपस्थिती मध्ये आमदार रमेश आप्पा थोरात ,दिगंबर दुर्गडे सर चेरमन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक प्रमुख आकर्षण अभिनेत्री मोनालिसा बागल,विकास दांगट संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, प्रविण शिंदे संचालक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, प्रतापराव गायकवाड माजी चेअरमन मार्केट यार्ड पुणे,रोहिदास उंद्रे माजी चेअरमन मार्केट यार्ड पुणे, माजी सरपंच नंदू पाटील काळभोर ,प्रविणनाना काळभोर बी जे पी नेते,प्रशांतदादा काळभोर शिवसेना हवेली प्रमुख ,दिलीप काळभोर माजी चेअरमन मार्केट यार्ड,प्रताप शंकर बोरकर डायरेक्टर साधना सहकारी बँक, स्वप्निल कुंजीर शिवसेना नेते तसेच राहुल काळभोर ग्रा.पं सदस्य पै.मनोज काळभोर कळंबा केसरी आदी मान्यवर उपस्थित होते.लोणी काळभोर पंचक्रोशीतील ग्रामस्थ, गोपाळभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारामती जय मल्हार पथकाने  दहिहंडी फोडली. आकर्षक विद्युत रोषणाई  जय गणेश 76 साऊंड सिस्टीम तालावर उपस्थित गोपाळ भक्तांनी जोरदार पद्धतीने ठेका धरला.  शिस्त बद्ध हजारोंचा संख्येत गोपाळभक्त उपस्थित होते. पोलिसांचा सत्कार करत कायदा व सुवयवस्थेचा मान ठेवत वेळेत लोणी काळभोर दहिहंडी कार्यक्रमानंतर जय मल्हार ग्रुप बक्षिस घेऊन पुन्हा बारामतीला परतले.