March 30, 2026
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
         अंगणवाडी हे सर्व आरोग्य, पोषण आणि शिक्षण विषयक योजनांचे मध्यवर्ती केंद्र आहे. 3 ते 6 वयोगटातील मुलांच्या आरोग्यासोबतच त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणं हा देखील यामागचा उद्देश आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी आणि कुपोषणाचा दर कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली गेली.    

  आज  देशात 12 लाखांहून अधिक अंगणवाड्या असून यापैकी महाराष्ट्रात ग्रामीण, आदिवासी आणि शहरी वस्त्यांमध्ये जवळपास 1 लाख 10 हजार अंगणवाड्या आहेत.  या अंगणवाड्यांमध्ये  अंदाजे 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करतात.तसेच कान्हूर मध्ये  TVS कंपनीच्या  सीएसआर फंडातून अंगणवाडी सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी ३८००००(तीन लाख 

ऐशी हजार रु) उपलब्ध करून देण्यात आले होते.अंगणवाडी कामासाठी लोकसहभाग म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर, दानशूर दात्यांनी ५६०००/-रुपये मदत जमा केली होती.अगणवाडी साठी केलेल्या मदतीचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.TVS,कंपनीचे अधिकारी योगेश्वर पाटील सर, सोमनाथ काटकर सर, सौ मालन जाधव या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.TVS कंपनीचे सोमनाथ काटकर सर,व TVS कंपनी व बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या मालनताई जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन,ट्राफी देऊन सन्मान करण्यात आला.TVS कंपनीच्या माध्यमातून अंगणवाडीसाठी केलेल्या मदतीबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मानित केले.उद्घाटन समारंभ अंगणवाडी सेविका , उपस्थित ग्रामस्थ,मान्यवर यांच्या हस्ते पार पडला या निमित्ताने गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.