March 30, 2026

सुनील भंडारे पाटील 

          शिरूर हवेली मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांनी सणसवाडी (ता शिरूर) येथील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आपण आयुष्यात मोठी स्वप्न पहावी असे बोलत आमदार अशोक बाप्पु पवार यांनी  शिरूर तालुक्यातील अनेकजण अधिकारी आहेत. आय ए एस,आय पी एस,आय एफ एस अशा पदासाठी प्रयत्न करायला हवा.एम पि एस सी , यु पि एस सी परीक्षा देत उज्वल आयुष्य घडवायला हवे असे मार्गदर्शन केले,

आमदार अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला यावेळी कृषी पदवीधर असलेल्या आमदार पवार यांनी विद्यार्थ्यांना शेतीशी निगडित प्रश्न विचारला बाळांनो सांगा बर आंब्यांच्या जाती किती ? तसेच कोणते झाड कोठे लावायचे , कोणत्या झाडाचा काय फायदा असे  मार्गदर्शन करत हितगुज साधले यावेळी आमदार पवार यांनी विद्यार्थ्यांना  एक मोलाचा सल्ला दिला. मोबाईल ही गरजेची वस्तू आहे  तिचा योग्य वापर व्हावा पण फक्त मोबाईल म्हणजे सर्वकाही आहे अस नाही .विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिरेक टाळावा तसेच मोबाईलचा नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्य शिकण्यासाठी व ज्ञान मिळवण्यासाठी स्मार्ट वापर करावा. पुस्तक वाचन वाढायला हवे.    

 तसेच यावेळी शिक्षक व पालकांना मोलाचं सल्ला देत शाळेत प्रार्थनेच्या वेळी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारून त्यांना बक्षीस देत त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे. यावेळी आमदार अशोक बाप्पू पवार यांनी गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार केला.   

 यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडितआप्पा दरेकर, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, मार्केट कमिटीचे माजी सदस्य दत्तात्रय हरगुडे, सणसवाडी ग्राम नगरीच्या सरपंच सुवर्णा रणादास दरेकर,उपसरपंच दत्तात्रय हरगुडे,माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर,स्नेहल राजेश भुजबळ, संगीता नवनाथ हरगुडे, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, सागर दरेकर, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, शशिकला सातपुते,रुपाली दरेकर,ललिता दरेकर,तनुजा दरेकर, राजेंद्र दरेकर, अक्षय कानडे , मोहन हरगुडे,ग्रामसेवक बाळणाथ पवणे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, मुख्याध्यापिका राधिका मेंगवडे मॅडम, माजी सरपंच साहेबराव दरेकर पत्रकार अमोल दरेकर, गोरक्ष भुजबळ सुभाष दरेकर,दगडू नाना दरेकर,नवनाथ हरगुडे, नवनाथ दरेकर,आयोजक रामदास नाना दरेकर, ग्रामस्थ, शालेय शिक्षण समिती, शिक्षकवृंद व कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,