March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
          पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वढू बुद्रुक येथील  शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ भंडारे सर यांना देण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील गुणवंत शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर बंधू भगिनींना मुख्याध्यापक संघा तर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार दरवर्षी देण्यात येत असतो. जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व अध्यापनाबरोबरच नवनवीन गुणवत्ता वाढीचे उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येत असतो. सरांनी आजपर्यंत अध्यापनाबरोबरच शाळेच्या भौतिक सुविधांकडे सुद्धा चांगल्या पद्धतीने लक्ष दिले तसेच निकालाची परंपरा सुद्धा चांगली ठेवली त्यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय दीपक शेलार साहेब अवर सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, भोसले साहेब अवर सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखरे मॅडम, शशांक मोहिते, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर सर, कार्याध्यक्ष मधुकर नाईक सर,पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजीराव कामथे सर, सचिव प्रसाद गायकवाड सर, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे सर,जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले सर, त्याचप्रमाणे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके सर,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव व तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम सर, उपस्थित होते. जिल्ह्यातून मुख्याध्यापक ,शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते . हा पुरस्कार मिळाल्यामुळे श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ वढु  बुद्रुक त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ वढू बुद्रुक यांनी सोमनाथ भंडारे सर यांचे अभिनंदन केले.