March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

             सणसवाडी (तालुका शिरूर) मयूर नगर आयोजित दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामाता नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे,         

शिरूर हवेली तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार, सुजाता भाभी पवार यांच्या मार्गदर्शनाने घटस्थापना, दुर्गादेवीच्या स्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या नऊ दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला या ठिकाणी पहावयास मिळते, नऊ दिवस विविध प्रकारच्या नामांकित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे, घटस्थापनेनंतर आज मंगळवार पासून रोज, सोनू चा नाद करायचा नाय,होम मिनिस्टर, जादूगार ईश्वर, आली लहर केला कहर, 36 नखरेवाली, स्वर संगम, नथीचा नखरा, धमाका, एकापेक्षा एक अप्सरा, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांना आरतीचा मान देण्यात येणार आहे, महिलांसाठी होणाऱ्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात आकर्षक बक्षीसही ठेवण्यात आले आहेत,    

सणसवाडी मधील व आसपासच्या गाव मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहत असून, नागरिकांना जास्तीत जास्त उपस्थित राहण्याच्या आवाहन  कार्यक्रमाचे संयोजक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ संस्थापक पंडित आप्पा दरेकर, अध्यक्ष लक्ष्मण दरेकर, उपाध्यक्ष अशोक करडे, आधारस्तंभ रामदास भाऊ दरेकर, व सणसवाडी ग्रामस्थांनी केले आहे,

कार्यक्रम स्थळी, दर दिवस कार्यक्रम शांततेत पार पाडवा यासाठी व्यवस्थित नियोजन करण्यात आले असून महिला व पुरुष वर्ग तसेच मुलांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे, सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहेत, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्वतंत्र व्यासपीठ, इतर सोयी सुविधा काटेकोरपणे अवलंबण्यात आले आहेत,