March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

                श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंग लोणीकंद (ता हवेली) पुणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंग लोणीकंद पुणे, या ठिकाणी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS ) इंजिनीरिंगच्या वैकल्पिक विषयावर (Elective  Subject -VI )  फॅकल्टी ओरिएंटेशन प्रोग्राम घेण्यात आला.  यामध्ये  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. 

               या कार्यशाळेमध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS ) इंजिनीरिंगच्या अभ्यासक्रम तयार  केलेल्या  संबंधित विषयाच्या तज्ञ प्रशिक्षकांनी  मार्गदर्शन केले. त्या मध्ये प्रा. दिनेश भदाणे, प्रा. विक्रम अभंग, प्रा. पी. घोरपडे, प्रा. वैशाली इंगळे, प्रा. ऋचा अग्रवाल यांनी उपस्थित शिक्षकांना आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS ) इंजिनीरिंगच्या वैकल्पिक विषयावर (Elective  Subject -VI )  विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. 

            यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मारुती (बापु) रामचंद्र भूमकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना  या कार्यशाळेमध्ये शिक्षकांना मिळालेल्या मार्गदर्शनामुळे विध्यार्थाना त्याचा नक्कीच भविष्यात फायदा होईल. असे मत व्यक्त केले व तज्ञ प्रशिक्षकांनी केलेल्या प्रभावी मार्गदर्शनाची प्रशंसा केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ.  सुजाता राव यांनी सदर मार्गदर्शनातील प्रभावी मुद्दे की ज्याचा भविष्यकालीन आधुनिकतेवर  परिणाम होईल ते अधोरेखित केले. तसेच भविष्यकाळातील आर्टीफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AI & DS ) क्षेत्रातील आव्हाने आणि त्याची जगाला असणारी गरज याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच  त्यासाठी उपस्थित सर्वच  शिक्षकांनी श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनेररिंगचे आभार मानले. 

या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख व शिक्षक व शिक्षेकेतर सहकारी उपस्थित होते. या कार्यक्राचे समन्वयक म्हणून प्रा. विकास गायकवाड व त्यांचे सहकारी  यांनी काम पहिले व प्रास्ताविक प्रा. गिरीशा बोंबले यांनी केले