March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
              शिक्रापूर येथील पाबळ चौकातून पुढे जाणाऱ्या शिक्रापूर – हिवरे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. याबाबतीत सर्वप्रथम वृत्त ” भरारी ” ने प्रसिद्ध केले होते  या रस्त्याचे काम सुरू करण्याबाबतची मागणी आमदार ऍड. अशोक पवार यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्या पुजा भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार आमदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

           रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहन चालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा. तसेच या रस्त्यावरून विद्यार्थी पायी व सायकलवर येत असतात त्यामुळे वाहन चालकांनी जबाबदारीने वाह चालवावे व वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्या पुजा भुजबळ यांनी केले आहे. तर रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.