March 30, 2026
शिरूर विशेष प्रतिनिधी
    टाकळी हाजी (तालुका शिरूर) येथील आदर्श शिक्षक विलास पोपटराव गावडे सर यांना राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे.

    विलास गावडे सर हे सध्या काठापूर तालुका शिरूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कार्यरत आहे.त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे.त्यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत देखील आले आहेत,त्यांच्या याच कार्याची दाखल शब्दधन सोशल फाऊंडेशन यांनी घेतली आहे.शब्दधन सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविले जाते.

          सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि.४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता मेडीको गिल्ड, भिकोबा तांचे सभागृह, एम. आय. डी. सी. बारामती येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यांच्या या गौरव पुरस्कार निवडीबद्दल शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, टाकळी हाजी गावचे सरपंच अरुणाताई घोडे, उपसरपंच गोविंद गावडे यांनी अभिनंदन केले.