रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
पुणे जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीने महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा ८०० वा अवतरण दिन महोत्सव रविवार दि ४ सप्टेंबर २०२२ रोजी कासार साई (तालुका मुळशी) येथे संपन्न होणार आहे,
साहित्य क्षेत्रातील विद्वान साहित्यीक, प्रवाचक लेखक राजकारणातील मान्यवर
सामाजिक क्षेत्र, सहकार क्षेत्र, कृषीक्षेत्र, औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत, तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील संत-महंत, प्रवाचक, किर्तनकार, महानुभाव संप्रदायातील जेष्ठ श्रेष्ठ आचार्यप्रवर संत-महंतांचे उपस्थितित भव्य स्वरूपात साजरा होत आहे. या निमित्ताने प्रातः मंगल अभिषेक, श्रीमद्भगवत संपन्न होईल
गिता पठन, धर्मध्वजारोहण अखिल भारतीय महानुभाव परिषदचे अध्यक्ष महंत श्री विद्वांस बाबा शास्त्री यांच्या अध्यक्षते खाली धर्मसभा होत आहे. या सभेत महंत नागराज बाबा, महंत राहेरकर बाबा ,महंत अंकुळनेरकर बाबा, महंत सातारकर बाबा, महंत संतोषमुनी शास्त्री यांची प्रवचने होणार आहेत. या सोहळ्यात समाजातील मान्यवर समाजसेवकांचा सत्कार होणार आहे. पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत मुकुंदराज बाबा कासारसाई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे महात्मा गोवर्धन शास्त्री वाघाळे यांनी सांगितले आहे. सदर कार्यक्रमांस सात ते आठ हजार भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत,


