शिरूर तालुक्याचे सुपुत्र शरद पाबळे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवडीप्रित्यर्थ पुण्यातील ॲग्रीकल्चर कॉलेजचे सभागृहात सत्कार प्रसंगी देशमुख व विश्वस्त नाईक आणी मान्यवरांचे हस्ते पाबळे यांचा सत्कार करणेत आला . यावेळी परीषदेचे पदाधीकारी , मिडीया पत्रकार व अँग्रीकल्चरचे अधिष्टाता मासळकर साहेब उपस्थीत होते . त्यांनी निरोगी व स्वस्थ जिवनासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले . घरचे, आईबाप निलाजरेपणे सांगतात , पोरं ऐकत नाहीत ? की तुम्हीच मोबाईलमध्ये व्यस्त असल्याने त्यांचेकडे लक्ष देत नाहीत . त्यांना उचलून बाहेर हरणं दाखवा , नादवा , खेळवा , गप्पा गोष्टी सांगून त्यांचं ध्यान दुसरीकडे वळू शकतं, पण ते कष्ट कोण घेत,
उपस्थीतांचे स्वागत पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लोणकर यांनी तर सुत्रसंचलन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी व आभार प्रदर्शन शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी केले .
मोबाईलचे दुष्परीणामांचा धोका खतरा डेंजर असं कुठं लिहीलेलं नसतं , कुणाला परीणामाची कल्पना नसते . एका करोडपती अधिकाऱ्याच्या ७ वर्षाच्या मुलाला मोबाईलचे इफेक्टीव लाईटींग मुळे चष्मा लागून डोकं हँग बधीर झालं – पोरगं कामातून गेल्यावर करोडला काय चाटता ? तेव्हा पालकांनी जागे व्हा , पत्रकारांनी सर्वकश सर्वत्र प्रसारण, प्रबोधन करावे , अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली .



