सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन व वारकरी साहित्य परिषद , महाराष्ट्र ,यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी येथील मावळ तालुका धर्मशाळेमध्येबिजोत्सव सोहळा साजरा करण्यात आला . सकाळी नऊ वाजता आळंदी येथील ४० वर वारकरी शिक्षण संस्थातील दीड हजारावर मुलांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरा पासून ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात दिंडी काढून प्रदक्षिणा घालत दिंडीचे कार्यक्रम स्थळी आगमन झाले . साहित्यपरिषदेचे सचिव लक्ष्मण शेठ शेरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .यावेळी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल पाटील , विश्वस्त चैतन्य महाराज कबीर बुवा ,सहसचिव नरहरी बुवा चौधरी ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब महाराज हांडे, जिल्हाध्यक्ष प्रशांत महाराज मोरे , उपाध्यक्ष पुंडलिक महाराज चौरे, महिला जिल्हाध्यक्ष हभप सविताताई गवते , पुणे शहराध्यक्ष आनंद महाराज कदम , सहसचिव ह भ प शामराव गायकवाड , सदस्य हभप राजेंद्र गरुड, हभप पोपट महाराज मिडगुले, ज्ञानेश्वर मिड गुले , हभप गणेश मालुजकर, जिल्ह्यातील साहित्य परीषदेचे सदस्य , सावता महाराज शिक्षण संस्थेतील ज्ञानेश्वर महाराज गवळी व ४० वारकरी शिक्षण संस्थेचे चालक व विद्यार्थी उपस्थित होते .
दिप प्रज्वलन व ज्ञानोबा तुकोबांचे प्रतिमेस पुष्पहार घालून हभप महादेव महाराजांचे अभंगाने स्वागत करणेत आले . प्रास्ताविकात हभप प्रशांत महाराज मोरे यांनी संत साहित्याचा वसा व वारसा पुढील पिढीकडे जाण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वाईट प्रवृतींना व विकृत विनोदांना थारा नको .नारदाच्या गादीचे पावित्र्य राखूनच किर्तनसेवा सादर व्हाव्यात . हभप नरहरी चौधरी यांनी नवपिढीला सामावून घेण्याचे आवाहन केले . चैतन्य महाराज कबीर बुवा यांनी वारकरी शिक्षण संस्था चालकांच्या अडचणी प्रसंगी मदत करण्याचे सुतोवाच केले . हभप विठ्ठल पाटील यांनी ३६ जिल्ह्यात वारकरी साहित्य परीषदेचे काम चालू असून शाळा कॉलेजांनी संत साहित्याचा प्रसार करण्याचे धोरण सांगितले . संताचे साहित्य म्हणजे फक्त अभंग नसून त्यामध्ये ओव्या , श्लोक , दोहे , गौळण , भारूडादी डझनावर आशयघन प्रकार असून यांचा भावार्थ प्रबोधनात्मक असून चालीही आर्केस्ट्राच्या गाण्यां पेक्षा चांगल्या आहेत पण त्या तरुणाईच्या कानी पोचत नाहीत , ज्या शेकडो वर्षानंतरही चिरतरुण वाटतात . छोट्या हरीपाठपासून सुरुवात करून मुलांना अध्यात्म परमार्थाची गोडी लावल्यासच पुढील पिढी सुसंस्कारीत घडेल , असेही सांगितले . यावेळी संतकृपा या अंकाचे प्रकाशनही अध्यक्ष विठ्ठल पाटील व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . आळंदी ग्रामस्थ व वारकरी साहीत्य परीषदेच्या वतीने काकां जींचा वाढदिवस असलेने पुणेरी पगडी, तुकाराम महाराजांची मुर्ती व पुष्पगुच्छ हार घालून सत्कार करणेत आला . सचिव लक्ष्मण शेरकर यांनी सुत्रसंचलन केले . पसायदान व महाप्रासादाने संत तुकाराम बिजोत्सवाची सांगता झाली,


